
Chhaava Box Office Collection Day 4: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित 'छावा' (Chhaava) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. विकी कौशल (vicky kaushal) आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. छाावा बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 33.10 कोटी, दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी, तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 24.10 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे, 'छावा'ने 4 दिवसात एकूण 145.53 कोटी रुपये कमावले आहेत.
सोमवारीही 'छावा' ची मोठी कमाई
View this post on Instagram
या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे आणि चित्रपट यशस्वी करण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांसारख्या कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाला आणखी उत्कृष्ट बनवले आहे.