
Vicky Kaushal Visit Raigad: देशभरात शिवजयंतीचा (Shiv Jayanti 2025) उत्साह आहे. सर्व शिवभक्त महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या गड-किल्ल्यांवर दाखल होण्यासाठी निघाले आहेत. शिवनेरी, रायगडावर भव्य शिवजन्मोत्स सोहळ्यांच आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील प्रत्येक जण आज शिवकालीन क्षणांचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यातच अभिनेता विकी कौशलनेही (Vicky Kaushal) तो रायगडावर जात असल्याची घोषणा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत केली आहे.
अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. त्याने सिनेमात साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेक्षक सगळेजण विकी कौशलचा अभिनय पाहून गहिवरल्याचं सांगत आहेत. Political Leaders Post on Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरातील राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा
विकी कौशल सध्या ‘छावा’च्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रमोशन, मुलाखतींना उपस्थिती लावताना दिसतोय. आज व्हिडीओत त्याने रायगडावर जायचंय म्हटलं आहे. याबाबत विकीने व्हिडीओ शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे.
विकी कौशलने घेतला महत्त्वाचा निर्णय
“नमस्कार, उद्या 19 फेब्रुवारी आहे… आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मी स्वराज्याच्या राजधानीत म्हणजेच रायगडावर जात आहे. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करूयात, त्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषाने साजरी करूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!” असा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत विकीने रायगडावर येणार असल्याची घोषणा केली आहे.
छावाची 4 दिवसांची कमाई
दरम्यान, विकी कौशलचा ‘छावा’ 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. अवघ्या 4 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 145 कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटात विकीसह रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, अक्षय खन्ना, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, संतोष जुवेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.