Photo Credit- X

Delhi CM Oath taking Ceremony: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या (Delhi CM) शपथविधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता होणार होता. परंतु, आता हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. शपथविधीची वेळ निश्चितच बदलली आहे, पण तारीख तीच आहे. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ आता 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होईल.

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कार्यक्रमाचे ठिकाण रामलीला मैदान निश्चित झाले आहे. तथापि, अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमत झालेले नाही. उद्या होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Sunita Williams To Return To Earth: अंतराळातून आली आनंदाची बातमी! सुनीता विल्यम्स 'या' दिवशी पृथ्वीवर परतणार)

50 हून अधिक उच्च सुरक्षा नेते, 20 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

आज रात्रीपासून रामलीला मैदानाकडे जाणारे रस्ते बंद राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हून अधिक उच्च सुरक्षा नेतेही रामलीला मैदानावर पोहोचतील. या शपथविधी सोहळ्याला 20 राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. सर्व केंद्रीय मंत्र्यांना आणि एनडीए नेत्यांनाही बोलावण्यात आले आहे.

शपथविधी सोहळ्याला 50 चित्रपट कलाकार उपस्थित

शपथविधी सोहळ्यापूर्वी रामलीला मैदानाच्या व्यासपीठावर संगीत आणि गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम होईल. कैलाश खैर यांचे सादरीकरण होईल. चित्रपट कलाकार अक्षय कुमार, विवेक ओबेरॉय, हेमा मालिनी यांच्यासह ५० हून अधिक चित्रपट कलाकार उपस्थित राहतील. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यासह डझनभर उद्योगपती रामलीला मैदानावर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बाबा रामदेव, स्वामी चिदानंद, बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.