शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे, तर कुशल प्रशासकही होते. त्यांनी न्याय, करप्रणाली, संरक्षण, व्यापार, कृषी आदी विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले व शिवरायांच्यानंतरही अनेक राजे झाले, मात्र सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते.
...