केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा असल्याचे भासवून हरिद्वारमधील राणीपूर येथील भाजप आमदार आदेश चौहान यांच्याकडे एका तरुणाने फोनवरून पाच लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, चौहान यांना फोन करणाऱ्याने आक्षेपार्ह भाषेत उत्तर दिले आणि पैसे देण्यास नकार दिल्यास सोशल मीडियावर प्रतिष्ठा खराब करण्याची धमकी दिली.
...