भारतात 7 ते 9 मे 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे, 12 व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. ही परिषद इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि ऍस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (ASI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. ग्लेक्स 2025 ही भारताच्या जागतिक अंतराळ क्षेत्रातील नेतृत्वाचा आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. आता या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित होत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही. ते उत्सुकता, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. भारतीय अंतराळ प्रवास या भावनेचे प्रतिबिंबित करतो. 1963 मध्ये एक लहान रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश बनण्यापर्यंत, आमचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. आमचे रॉकेट पेलोडपेक्षाही खूप काही बाबी वाहून नेतात. ते 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने पूर्ण करतात. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून इतिहास घडवला. चंद्रयान-1 द्वारे चंद्रावर पाणी शोधले, चंद्रयान-2 द्वारे चंद्राच्या सर्वोच्च-रिझोल्यूशन प्रतिमा टिपल्या आणि चंद्रयान-3 द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल जगाची समज वाढवली.’ (हेही वाचा: India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना)
Global Conference on Space Exploration:
#WATCH | Prime Minister Narendra Modi's video message, recorded yesterday for the Global Conference on Space Exploration, is being aired.
PM Modi says, "Space is not just a destination. It is a declaration of curiosity, courage and collective progress. Indian space journey… pic.twitter.com/DGyRC39GSV
— ANI (@ANI) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)