IND vs ZIM T20 Series 2024: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) आहे, तर झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व सिकंदर रझाकडे आहे. टी-20 विश्व क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. वास्तविक, भारतीय संघ विश्वचषक जिंकल्यानंतर प्रथमच झिम्बाब्वेविरुद्ध खेळत आहे. त्याचवेळी, आत्तापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे आठ वेळा टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारताकडून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला पहिला धक्का लागला आहे. झिम्बाब्वे संघाचा स्कोर 14/1
1ST T20I. 1.6: Mukesh Kumar to Brian Bennett 4 runs, Zimbabwe 14/1 https://t.co/r08h7yglxm #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)