गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताना ते म्हणाले की, अडीच वर्षांत त्यांनी आमच्या पक्षातील काही सदस्यांना हिसकावून घेतले आहे. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे नाना पटोले म्हणाले आहेत. पटोले यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘नाना पटोले आपण भाजपमध्ये होतात हे विसरू नका. शरद पवार साहेबांच्यावर टीका करून राजकीय स्थान पक्के करून घेणारे खूप आहेत त्यात आपण पण...’, असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)