माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव मंगळवार (8 एप्रिल) पासून त्याच्या राजकीय इनिंगला सुरुवात करत आहेत. केदार जाधव आज भारतीय जनता पक्षात सामील होणार आहे. दुपारी 3 वाजता तो भाजपमध्ये सामील होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार जाधव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करेल. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी केदार जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलार यांचीही भेट घेतली.
केदार जाधव हा पुण्याचा रहिवासी आहे. त्याने भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टी-20 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली नव्हती. केदार जाधवने आतापर्यंत फक्त 9 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. केदार जाधवने 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आयपीएलमध्ये 95 सामने खेळले आहेत. 40 वर्षीय केदार ने 3 जून 2024 रोजी क्रिकेटला अलविदा केला होता, आणि आता त्याने राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: No Retirement At 75 Rule In BJP: 'भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्तीचा नियम नाही, संजय राऊत पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ ठरवू शकत नाहीत'- Chandrashekhar Bawankule)
Kedar Jadhav to Join BJP:
Former Cricketer Kedar Jadhav To Join BJP | फडणवीसांच्या हस्ते केदार जाधव भाजपात प्रवेश करणार #cricketer #kedarjadhav #bjp #cmdevendrafadanvis #maharashtrapolitics pic.twitter.com/nt2pzR7noH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)