दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दिल्लीचा गड भाजपने जिंकला असून, आता राजधानीमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. दिल्लीतील 36 जागांचा बहुमताचा आकडा पार करत, 27 वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. भाजपने 37 जागा जिंकल्या आहेत आणि 11 जागांवर आघाडीवर आहेत. यंदा दिल्लीत काँग्रेसचे खातेही उघडले नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या विजयाबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लिहिले- 'जनशक्ती ही सर्वोपरि आहे. विकास जिंकतो, सुशासन जिंकतो. भाजपला हा अद्भुत आणि ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल मी दिल्लीतील माझ्या प्रिय बहिणी आणि बंधूंना वंदन आणि अभिनंदन करतो. तुम्ही दिलेल्या उदंड आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. ही आमची हमी आहे की आम्ही दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. यासोबतच विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका राहील, याची आम्ही खात्री करू. या मोठ्या जनादेशासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांच्या सेवेसाठी आणखी दृढपणे समर्पित राहू.’ (हेही वाचा: Delhi Election Result 2025: 'आप'ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत; नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मांनी खुलवलं कमळ)
PM Narendra Modi Hails BJP’s Win In Delhi Elections:
जनशक्ति सर्वोपरि!
विकास जीता, सुशासन जीता।
दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार।
दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)