Arvind Kejriwal defeated (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा)

Delhi Election Result 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात (New Delhi Assembly Constituency) प्रवेश वर्मा (Parvesh Verma) यांनी त्यांचा दारुण पराभव केला आहे. केजरीवाल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने परवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

नवी दिल्ली विधानसभा जागेसाठी सर्वच पक्षांनी आपले तगडे उमेदवार उभे केले होते. मात्र, या जागेवर भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी कमल खुलवलं आहे. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. तर, काँग्रेसचे संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. (हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'केजरीवाल यांनी माझे ऐकले नाही, त्यांचे लक्ष दारूवर होते...'; दिल्ली निकालांवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया)

मनीष सिसोदिया यांचा पराभव -

केजरीवालांव्यतिरिक्त, आप नेते मनीष सिसोदिया देखील पराभूत झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या इतर अनेक मोठ्या नेत्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातूनही पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. आम आदमी पक्ष सत्तेत आला तर ते चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील, असे केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते.  (हेही वाचा -Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर BJP ची सत्ता येण्याची शक्यता; निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार पक्ष 45 जागांवर आघाडीवर)

यासोबतच त्यांनी मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली होती. तथापि, पक्षाच्या दोन्ही मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आम आदमी पक्षाचे दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्पप्न आता भंगलं आहे. अद्याप भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, ट्रेंडमध्ये भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे.