Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर BJP ची सत्ता येण्याची शक्यता; निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार पक्ष 45 जागांवर आघाडीवर

सुरुवातीच्या अंदाजानुसार, भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष आम आदमी पक्ष सध्या 25 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर, निवडणूक आयोगाच्या मते, आतापर्यंत काँग्रेस कोणत्याही जागेवर आघाडीवर नाही.

Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर BJP ची सत्ता येण्याची शक्यता; निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार पक्ष 45 जागांवर आघाडीवर
Delhi Assembly Election Result 2025 (Photo Credits: LatestLY)

Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. यामध्ये भाजपने सातत्याने आघाडी कायम ठेवली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष आम आदमी पक्ष सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर, निवडणूक आयोगाच्या मते, आतापर्यंत काँग्रेस कोणत्याही जागेवर आघाडीवर नाही आणि असा अंदाज आहे की यावेळीही काँग्रेस आपले खाते उघडू शकणार नाही. सुरुवातीच्या कलांमध्ये, मुस्लिम जागांवरही भाजप आघाडीवर आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाचे जवळजवळ सर्व मोठे नेते सुरुवातीच्या फेऱ्यांपासून मागे पडले आहेत. मुख्यमंत्री आतिशी पहिल्या फेरीपासून पिछाडीवर आहेत यामध्ये हायटेक मानल्या जाणाऱ्या नवी दिल्ली विधानसभा जागेवरून अरविंद केजरीवाल देखील पिछाडीवर आहेत. जवळपास 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्टर जारी करून दिल्लीतील जनतेला आपला संदेश दिला आहे. या पोस्टरवर लिहिले आहे, ‘दिल्लीत येत आहे भाजपा’. दिल्ली निवडणुकीच्या निकालांचे अधिकृत ट्रेंड राष्ट्रीय राजधानीत भाजपचे पुनरागमन दर्शवत असल्याने, आता भाजप कार्यालयात जल्लोष व उत्सव सुरु आहे.

Delhi Assembly Election Result 2025:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2025 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).