![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/gjhjdx-34-.jpg?width=380&height=214)
Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या (Delhi Assembly Election Results 2025) सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष मागे पडला आहे. त्याचवेळी, केजरीवाल त्यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातूनही पिछाडीवर आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे की, 'मी नेहमीच म्हटले आहे की उमेदवाराचे आचरण आणि विचार शुद्ध असले पाहिजेत, जीवन दोषरहित असले पाहिजे आणि त्याग असावा. या गुणांमुळे मतदारांचा त्यांच्यावर विश्वास बसतो.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना अण्णा हजारे म्हणाले की, 'मी त्यांना सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही आणि शेवटी त्यांचे लक्ष दारूवर केंद्रित झाले. हा प्रश्न का उद्भवला? ते संपत्ती, शक्तीने भारावून गेले होते. हजारे यांनी असेही उघड केले की, त्यांनी सुरुवातीपासूनच 'आप'पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा एक बैठक झाली तेव्हा मी पक्षाचा भाग न राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून मी दूरच राहिलो आहे. (हेही वाचा -Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर BJP ची सत्ता येण्याची शक्यता; निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार पक्ष 45 जागांवर आघाडीवर)
निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार भाजप बहुमताच्या आकड्याच्या खूप पुढे आहे. सध्या 70 पैकी 42 जागांवर भाजप आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी शनिवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल. परंतु, अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेली नाही. यासंदर्भात सर्वस्वी निर्णय केंद्रीय नेतृत्वाचा राहील. (हेही वाचा -Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये BJP आघाडीवर; पक्षाच्या मुख्यालयात जल्लोष व उत्सवाची तयारी सुरु (Video))
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर झालेल्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, भारतीय जनता पक्ष 43 जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पक्ष (आप) दिल्लीतील 27 विधानसभा जागांवर आघाडीवर आहे.