Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये BJP आघाडीवर; पक्षाच्या मुख्यालयात जल्लोष व उत्सवाची तयारी सुरु (Video)

विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर असल्याने पक्षाच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप कार्यालयात मिठाई येण्यास सुरुवात झाली आहे, पक्षाने उत्सवाची तयारी सुरू केली आहे.

Delhi Assembly Election Result 2025: दिल्लीत सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये BJP आघाडीवर; पक्षाच्या मुख्यालयात जल्लोष व उत्सवाची तयारी सुरु (Video)
Delhi Assembly Elections Results 2025 (Photo Credits: LatestLY)

सध्या दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालाची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीचे ट्रेंड हे एखाद्या सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाहीत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालावरून, दिल्लीत सत्ता उलटताना दिसत आहे. भाजपने आघाडीच्या बाबतीत बहुमताचा आकडा ओलांडला आहे. भाजप सध्या 40 जागांवर आघाडीवर आहे, तर अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप सध्या 30 जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेस सकाळी एका जागेवर आघाडीवर होता ,मात्र आता ती जागाही त्यांच्या हातातून निसटल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात निकराची लढत दिसून येत आहे. जर या सध्याच्या ट्रेंडचे निकालांमध्ये रूपांतर झाले तर, याचा अर्थ असा की भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्ता स्थापन करेल, आणि ही बाब अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का असेल.

दुसरीकडे, विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर असल्याने पक्षाच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप कार्यालयात  मिठाई येण्यास सुरुवात झाली आहे, पक्षाने उत्सवाची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुका झाल्या. आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी सुरू आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संदीप दीक्षित आणि प्रवेश वर्मा यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कडक सुरक्षेत सर्व जागांवर मतमोजणी सुरू आहे. एक्झिट पोलने दिल्लीत भाजपचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. (हेही वाचा: Milkipur By-Election Result 2025: दिल्ली पाठोपाठ यूपी विधानसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू, भाजप आणि सपामध्ये लढत)

Delhi Assembly Election Result 2025:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2025 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).