'Raam' हे Holland मधील चलन नव्हे; जाणून घ्या महर्षी पंथाने Dutch Country मध्ये सुरू केलेला हा Bearer Bond
"Raam" bearer bond (Photo Credits: Twitter)

ट्वीटर वर सध्या "Raam" हे हॉलंड किंवा नेदरलॅन्ड मध्ये वैध चलन म्हणून वापरलं जात असल्याच्या अनेक पोस्ट धुमाकूळ घालत आहेत. यामध्ये असा देखील दावा केला जात आहे हे सगळ्यात महागडं चलन आहे. पण वास्तवात "Raam" हे चलन नसून बेअरर बॉन्ड आहे. हा 2001 साली Global Country of World Peace (GCWP) कडून प्रसिद्ध करण्यात आला होता. नेदरलॅन्ड आणि अमेरिकेमध्ये त्याचा वापर काही विशिष्ट वर्गाकडून देवाणघेवाणीसाठी केला जातो. खरंच ज्या 500 रूपयाच्या नोटांवर RBI Governor च्या सही जवळ हिरवी पट्टी नसेल तर त्या घेतल्या जाणार नाहीत? पहा PIB Fact Check चा खुलासा.

Global Country of World Peace ची स्थापना ही महाऋषी महेश योगी यांनी केली होती. ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांनी "Raam" लॉन्च केले. GCWP ही एक एनजीओ असून अमेरिकेच्या Iowa मध्ये महाऋषी वैदिक सिटी आहे. त्यांच्याकडून "Raam" म्हणजे अशी एक लोकल करंसी जी आर्थिक घडामोडींना मदत करेल. स्थानिक व्यवसायामध्येही त्याचा वापर केला जाऊ शकतो. या मुस्लिम देशा च्या नोटांवर आहे 'गणपति बाप्पा' विराजमान, हे आहे कारण.

"Raam" हा राम पीस बॉन्ड म्हणून देखील ओळखला जातो. तो दहा युरोच्या समान आहे. अमेरिकेत तो दहा डॉलरच्या समान आहे. त्यामुळे याच्याच आधारे हे महागडं चलन असल्याचं म्हटलं जातं. एक युरो आज 88.09 (4 ऑगस्ट) आहे म्हणजे एका "Raam"ची किंमत 880.9 असल्याने ते महाग आहे.

"Raam" हे कोणत्याही देशाचं चलन नाही. कोणत्याही बॅंकेचं वैध चलन नाही. उलट तो बेअरर बॉन्ड आहे. चलन आणि बेअरर बॉन्ड मधील फरक म्हणजे त्यावर नंतर व्याज मिळते. "Raam" वर वर्षाला 0.6 सरळ व्याज मिळतं. "Raam" वर भगवान रामाचा फोटो आहे आणि 1,5,10 वर उपलब्ध आहे.

बीबीसी रिपोर्ट्स नुसार, Dutch Central Bank च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ते वैध चलन म्हणून न वापरणं आणि विशिष्ट वर्गात त्याचा वापर केला जाऊ शकतो. "Raam" कधीच अमेरिका, हॉलंड मध्ये वैध चलन नव्हते.