गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त आज कित्येक गणेश भक्तांच्या घरात, त्यांच्या परिसरात गणराय विराजमान झालेले पाहायला मिळतील. मात्र तुम्हाला माहित आहे का, बहुसंख्यांक मुस्लिम बांधव असलेल्या इंडोनेशियात गेल्या कित्येक वर्षांपासून हे गणपती बाप्पा नोटांवर विराजमान आहेत. होय हे खरे आहे. बहुसंख्यांक मुस्लिम असलेल्या इंडोनेशियातील (Indonesia) नोटांवर गणपती बाप्पांचा फोटा आहे. या देशात 87.5% लोकसंख्या मुसलमान आहे. तर 3% हिंदू आहेत.
आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की, जो देश बहुसंख्यांक मुस्लिम आहे, त्या देशातील नोटांवर गणपतीचा फोटो कसा काय? तर हा फोटो छापण्यामागे कारणही तितके खास आहे.
जाणून घ्या सविस्तर
नोटेचं महत्त्व
इंडोनेशियामध्ये शिक्षण,कला आणि विज्ञानाची देवता म्हणून गणपतीला मानले जाते. 20,000 च्या नोटेवर पुढील बाजूला गणपती तर मागील बाजूला विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एकत्र फोटो आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षणमंत्री हजर देवांत्रा यांचा फोटो आहे.
20,000 च्या नोटेवर गणपतीचा फोटो
इंडोनेशियाच्या चलनालाही रूपया म्हणतात. त्यांच्या 20,000 च्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था संकटात होती. १९९७ साली अनेक आशियन देशांभध्ये चलनांत अवमूल्यन होत होते. ते रोखण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. गणपतीचा फोटो नोटेवर छापल्यानंतर हळूहळू सकारात्मक परिणाम दिसायला लागले. हा परिणाम बाप्पाच्या आशिर्वादाने झाला अशी त्यांची धारणा आहे.
भारतीय संस्कृतीचं इंडोनेशियात होतं दर्शन
इंडोनेशियामध्ये गणपतीप्रमाणेच हनुमानालाही खास स्थान आहे. इंडोनेशियन आर्मीचा मेस्कॉट हनुमान आहे. जकार्ता स्केअर या पर्यटनस्थळी अर्जून आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. सोबतच घटोत्कचीही मूर्ती आहे. हिंदू पुराणांचा प्रभाव बाली टूरिझमच्या लोगोवरही दिसतो.
इंडोनेशियात होणारे हे भारतीय संस्कृतीचे दर्शन खरच वाखाखण्याजोगे असून कौतुकास्पद आहे. नोटांवरील हे गणेशाचे फोटो 'सर्वधर्म समभाव' या गोष्टीची जाणीव करुन देतो.