Viral Post | Photo Credits: Twitter/ PIB Fact Check

सोशल मीडीयावर सध्या 500 च्या नोटांवरून काही पोस्ट झपाट्याने वायरल होत आहेत. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की अशी 500 रूपयांची नोट घेऊ नका ज्याच्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गर्व्हरनर यांच्या स्वाक्षरी नसून गांधीजींच्या फोटो जवळ आहे. दरम्यान या वायरल पोस्ट नंतर सामान्य लोकांमध्ये खळबळ पसरली आहे. अनेकांना हा दावा खरा आहे की खोटा? हे पडताळून पहायचं आहे. असली नोट त्यावर हिरवी पट्टी आरबीआयच्या साईन जवळ असल्यावरून खरंच होते का? दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक ने दिलेल्या माहितीनुसार, या हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.

पीआयबी कडून 500 रूपयांच्या नोटेच्या पडताळणीची पोस्ट खरंच खरी आहे का? या वर खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या माहितीनुसार, दोन्ही तर्‍हेच्या नोटा या व्यवहारामध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्यामुळे अशा खोट्या वृत्तापासून दूर रहा. त्यावर विश्वास ठेवू नका. तसेच समाजात भीती पसरेल अशा खोट्या बातम्या देखील पसवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2016 साली  भारत सरकारने जुन्या नोटांऐवजी 500 च्या नव्या नोटा महात्मा गांधीजींच्या फोटोसह व्यवहारात आणल्या होत्या. या नव्या नोटा आकार, रंग, रूपाने देखील वेगळ्या आहेत. Rs 2000 Note India Latest News: 2000 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? गेल्या दोन वर्षापासून छपाई बंद असल्याची माहिती समोर.

पीआयबी फॅक्ट चेक

सोशल मीडीयात मागील दीड वर्षात कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात खोट्या बातम्या झपाट्याने पसरल्या आहेत. तथ्यहीन किंवा खोटी वृत्त ही नागरिकांमध्ये खळबळ पसरवणारी असतातच पण ती अनेकदा सरकारसाठी देखील डोकेदुखी वाढवणारी असल्याने आता सरकारी यंत्रणा देखील सजग झाल्या आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी खोटी वृत्त नाकारण्यासाठी खास यंत्रणा ट्वीटर सह इतर सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर माहिती दिली जाते त्यामुळे कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यासाठी संबंधित विभागाची वेबसाईट एकदा नक्की पहा.