गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप सतत चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या प्राइवेसी पॉलिसी वरुन बरेच  वाद निर्माण होत आहेत.सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याने ट्विटर आणि फेसबुकवर भारतात बंदी घातली जाईल अशी अफवा पसरवली जात आहे.व्हाट्सएपवर केंद्र सर्व व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल रेकॉर्ड करत असल्याचा दावा करणारा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.पंतप्रधान, राजकारण, धर्म आणि सद्य परिस्थिती या विरोधात संदेश पाठविल्यास अरेस्ट वॉरंटशिवाय अटक होऊ शकते, असा ही दावा मेसेज मध्ये केला गेला आहे. (Fact Check: खोट्या माहितीचे खंडन करणाऱ्या 'पीआयबी फॅक्ट चेक'च्या नावाने बनवली खोटी वेबसाइट; लोकांना जागरूक राहण्याचे आवाहन)

फॉरवर्ड मेसेज पुढे असा दावा करतो की, संदेशातील तीन टिक चा अर्थ असा आहे की सरकारने संदेशाचा स्वीकार केला आहे. दोन निळे आणि एक टिक म्हणजे सरकार कारवाई करीत आहे आणि दोन निळे आणि दोन लाल म्हणजे "सरकार आपली माहिती तपासत आहे". तीन लाल टिक दिसल्यास "सरकारने आपल्याविरोधात कार्यवाही सुरू केली आहे आणि आपल्याला लवकरच कोर्टाचे समंस मिळेल", असा संदेशात दावा करण्यात आला आहे. (Fact Check: 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता' योजनेअंतर्गत तरुण बेरोजगारांना दर महिन्याला मिळणार 3500 रुपये? जाणून घ्या सत्य)

WhatsApp Claim 

मात्र व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शक तत्त्वांची व्हायरल यादी बनावट असल्याचे नुकतेच सत्य तथ्य पथकाला आढळले. सरकारने संप्रेषणाचे कोणतेही नवीन नियम जाहीर केलेले नाहीत. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोनेही (PIB) फेसबुकच्या माध्यमातून हा मेसेज शेअर केला होता. “भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही,” अशा आशायाची ती पोस्ट आहे . हाच दिशाभूल करणारा संदेश जानेवारी 2021 मध्ये हिंदीमध्ये ही व्हायरल झाला होता.

तसेच व्हॉट्सअॅपच्या मते, त्यांचे चॅट end-to-end encrypted  असतात ज्याचा अर्थ असा होतो की “केवळ आपण आणि आपण ज्यांच्याशी चैट करीत आहात त्याने काय पाठविले आहे ते तुम्हीच वाचू शकता आणि व्हॉट्सअ‍ॅपवर दूसरे कोणीही वाचू कोणीच नाही.त्यामुळे व्हॉट्सअॅप मेसेजेस रेकॉर्ड केल्याचा दावा खोटा आहे.