PIB Fact Check: भारत सरकार कडून 'कोरोना केयर फंड योजना' अंतर्गत सार्‍यांना 4000 रूपयांची मदत मिळणार? पहा या वायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मागील सत्य
Fake News| PC: Twitter/ PIB Fact Check

भारतामध्ये कोरोना संकटकाळामध्ये अफवांचे देखील पेव आले आहे. अनेकदा खोट्या बातम्या, अफवा सोशल मीडीयामध्ये झपाट्याने पसरत आहे. यामधून अनेकांची वैयक्तिक माहिती चोरणं, त्यांची फसवणूक करणं हा उद्देश असतो. अशामध्ये आता व्हॉट्सअ‍ॅपवर वायरल होत असलेला अजून एक मेसेज म्हणजे 'कोरोना केयर फंड योजना' अंतर्गत सार्‍यांना 4000 रूपयांची मदत मिळणार आहे. पण हा मेसेज खोटा असल्याचं पीआयबी कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मोदी सरकार कडून अशाप्रकारे कोणतीच योजना सरकारची नसल्याचं त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

दरम्यान वायरल मेसेज मध्ये एक लिंक दिली असून त्यामध्ये फॉर्म भरण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. पण अशाप्रकारे माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्यामुळे अशा बनावट मेसेजेसपासून दूर राहण्याचं आवाहन सरकार कडून यापूर्वी देखील करण्यात आले आहे. नक्की वाचा: खरंच ज्या 500 रूपयाच्या नोटांवर RBI Governor च्या सही जवळ हिरवी पट्टी नसेल तर त्या घेतल्या जाणार नाहीत? पहा PIB Fact Check चा खुलासा.

पीआयबी फॅक्ट चेक

कोरोना संकटात लॉकडाऊन मुळे नागरिकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत अनेकदा खोट्या बातम्या पसवल्या जात आहे. अशा अनेक घटना मागील काही दिवसांत समोर आल्याने आता सरकारी यंत्रणांकडून खोट्या बातम्यांची सत्यता पडताळून पाहून त्यामागील सत्य समोर आणलं जातं आणि खोट्या बातम्यांपासून लोकांना दूर ठेवले जाते.