Fact Check: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार नोकरी, लॅपटॉप आणि मोबाईल प्रदान करत आहे? PIB ने सांगितले सत्य
Fake Advertisement (Photo Credits: Twitter/PIBFactCheck)

सरकार आपल्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमे (Beti Bachao, Beti Padhao Campaign) अंतर्गत रोजगाराच्या संधींसह विविध फायदे देत असल्याचा दावा करणारी जाहिरात व्हायरल होत आहे. या योजनेअंतर्गत सरकार नोकऱ्या (Jobs), लॅपटॉप (Laptop) आणि मोबाईल (Mobile) देत असल्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि नोकऱ्या मिळवण्यासाठी लोकांना एसएमएस (SMS) द्वारे तपशील शेअर करण्यास सांगितले जात आहे. हा मेसेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे पीआयबी (PIB) ने यामागील तथ्य तपासले आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ने केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेसंदर्भातील जाहिरात हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. तसंच या योजनेअंतर्गत कोणालाही वैयक्तिकरित्या पैसे किंवा कुठल्याही प्रकारचे मोबाईल लॅपटॉप देण्याचे आश्वासन सरकारने दिलेले नाही, हे पीआयबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा व्हायरल होणारा मेसेज खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे. (Fact Check: MTNL KYC पुढील 24 तासांत संपणार असल्याचे ग्राहकांना खोटे मेसेज; PIB Fact Check ने केला खुलासा)

Fact Check by PIB:

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत करण्यात येणाऱ्या अशा फसव्या दाव्यांपासून सरकार आणि त्याच्या विविध एजन्सींनी वेळोवेळी लोकांना सावध करण्यात आले आहे. सरकारच्या योजनांविषयी अशा फसव्या जाहीरातींमधून फसवणूक होऊ नये म्हणून खऱ्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.