मनसे (MNS) हा राज्यातील छोट्या पक्षांपैकी एक असला तरी राज्यात गाजवलेल्या मोठमोठ्या मोहिम मनसेच्याचं आहेत असं म्हणायला हरकत नाही. राज्यातील कुठलाही एक ट्रेंन्डींग (Trending) मुद्दा हातात घेवून त्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या ठाकरे शैलीत एक विशेष मोहिम हातात घेताना दिसतात आणि होण्याऱ्या प्रकाराचा छडा लावत अनेक दुर्लक्षित मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतात. काही वर्षांपूर्वी टोलचा (Toll) मुद्दा मनसेने हाती घेतला आणि नंतर त्याचा बंदोबस्त करत अनेक ठिकाणी आकारण्यात येणारा वाढीव टोल बंद केला. नुकतीचं मनसेने मशिदींच्या भोंग्यावरील मोहिम सगळ्यांच्या लक्षात आहेचं. त्या पाठोपाठचं आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी लहान मुलांच्या वेठबिगारीबाबत होणाऱ्या घटनांबाबत एक विशेष पत्रक काढत राज्य सरकार आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला विशेष आवाहन केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) या पत्रात नमूद केलं आहे, विविध वर्तमानपत्रांमध्ये (News Paper) लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या अनेक बातम्या वाचण्यात येत आहेत. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं, असं आवाहन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्य सरकारला (Maharashtra Government) या पत्रातून केलं आहे. (हे ही वाचा:- Shivsena Dasara Melava 2022: शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा? शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी)
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.
वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. pic.twitter.com/sMxyOy4dzS
— Raj Thackeray (@RajThackeray) September 23, 2022
तसेच लहान मुलांच्या वेठबिगारी बाबत महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेने जागृकता ठेवावी. या संबंधीत प्रकार कुठेही आढळून आल्यान जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून (Raj Thackeray) या पत्रकात करण्यात आले आहे.