New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd ODI 2025 Live Streaming: न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 8 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 178 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. दुसरी वनडे जिंकून न्यूझीलंडच्या नजरा मालिकेवर कब्जा करण्यासाठी असतील. दुसरीकडे श्रीलंकेला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
दुसरा टी 20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 8 जानेवारी रोजी हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ अर्धा तास आधी असेल.
सामना कुठे आणि कसा पाहायचा?
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. याशिवाय, सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड संघ: मिचेल हे (विकेटकीपर), मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, विल्यम ओ'रोर्क, टॉम लॅथम, मायकेल ब्रेसवेल
श्रीलंका संघ : कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कामिंडू मेंडिस, झेनिथ लियांगे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, इशान मलिंगा, लाहिरू कुमारा, असिथा नुसान फर्नांडो, अशिथा फर्नांडो, जेनिथ फर्नांडो. मदुष्का, डुनिथ वेलालेझ, मोहम्मद शिराळ, महिष थेक्षाना