Photo- X/@sirajnoorani

Heavy Rain in Mecca, Saudi Arabia:मुसळधार पावसामुळे सौदी अरेबियातील पवित्र मक्का आणि मदिना या पवित्र स्थळांना पूर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी, ६ जानेवारी रोजी एकाच दिवसात ४९.२ मिमी पाऊस पडल्याने दोन्ही पवित्र शहरांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. या नैसर्गिक आपत्तीचा फटका शहरांना बसला असून, तेथील विमानतळ, रुग्णालयेही पाण्याखाली गेली आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहने पूर्णपणे पाण्यात बुडाली असून काही वाहने वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेले लोक आणि शहरांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती असल्याचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सौदी अरेबियातील मक्का-मदीना मध्ये मुसळधार पाऊस

वाळवंटातील शहर पुराच्या पाण्याने भरले

तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

स्थानिक प्रशासनाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, त्यामुळे मदतकार्यातील आव्हानेही वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढे काय होणार हे येणारा काळच सांगेल, पण सध्या हा परिसर पुराशी झुंज देत आहे.