महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्यांनाच फास्टटॅग (Fastag) बंधनकारक केले आहे. त्यामुळे सार्या खाजगी, कमर्शिअल गाड्यांना नॅशनल हायवे वर टोल नाका पार करण्यासाठी आपल्या गाडीवर फास्टटॅग लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कॅशलेस व्यवहारासोबतच एकूणच कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ministry of Road Transport & Highways कडून National Electronic Toll Collection program (NETC) लॉन्च करण्यात आले आहे. त्यामध्ये RFID technology द्वारा फास्टटॅगच्या माध्यमातून टोल वसुल केला जातो. यामुळे इंधन बचत होते. वेळ वाचतो आणि प्रवास अधिक सुकर होतो. टोल प्लाझावर 10 सेकंदाहून अधिक वेळ वाट पहावी लागल्यास Toll Tax वसूल केला जाणार नाही.
Maharashtra cabinet has decided that Fastag will be mandatory from 1st April 2025 for all vehicles in the state.
(file pic) pic.twitter.com/P5VkhAyqiG
— ANI (@ANI) January 7, 2025
1 डिसेंबर 2019 ला जाहीर केल्यानुसार, प्रत्येक टोल नाक्यावर फी प्लाझातील सर्व लेन (प्रत्येक बाजूला एक लेन वगळता) 'फी प्लाझाची FASTag लेन' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. NHAI ने सर्व फी प्लाझा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीमने सुसज्ज केले आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्य सरकारने मुंबई मध्ये 5 एंट्री पॉईंट्स वर टोल रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत वाशी, दहिसर, मुलुंड, ऐरोली आणि तीन हात नाका वरील टोल वसुली बंद करण्यात आली आहे.