वाहनचालकांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. खरंतर टोल प्लाझावर जर 10 सेकंदाहून अधिक वेळ वाट पहावी लागल्यास तर चालकाला टोल टॅक्स भरावा लागणार नाही आहे. वाहन चालकांसाठी टोल अधिक सुविधाजनक बनवण्याची NHAI ने घोषणा केली आहे. त्यानुसार टोल प्लाझावर जर रांग 100 मीटरहून अधिक लांब रांग असल्यास वाहन चालकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही आहे. नव्या नियमांनुसार टोल कलेक्शन पॉइंट्सवर पिवळ्या रंगाची लाइन ओढली जाणार आहे. तर टोल घेणाऱ्या व्यक्तीला निर्देशन दिले जाणार की, जर ट्रॅफिक पिवळ्या रंगेच्या सुद्धा पुढे गेल्यास त्या वाहन चालकांचे टोल माफ केले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असे म्हणणे आहे की, फास्टॅग अनिवार्य झाल्यानंतर बहुतांश टोल प्लाझावर वाहनांना वाट पहावी लागत नाही. त्यामुळे 100 मीटर लांबलचक रांगा सुद्धा लागत नाही.
NHAI चे असे म्हणणे आहे की, फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर बहुतांश टोल प्लाझावर वाहनांना वेटिंग करावी लागत नाही. नव्या गाइडलाइन्समध्ये हे सुद्धा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की, कोणत्याही टोल प्लाझावर गाड्यांची रांग 100 मीटरहून अधिक नसावी. मात्र तसे नसल्यास वाहनांकडून टोल वसूल केला जाणार नाही आहे. टोल प्लाझावर 100 मीटर दूरच्या माहितीसाठी पिळ्या रंगाची रेख आखली जाणार आहे.(Air India Flight: उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत एअर इंडियाच्या विमानाला करावे लागले लॅन्डिंग; कारण घ्या जाणून)
सध्या फास्टॅगच्या माध्यमातून जवळजवळ 96 टक्के टोल वसूल केला जात आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टोल कलेक्शनपाहता पुढील 10 वर्षात टोल प्लाझा तयार करण्यात येणार आहेत. एनएनआय यांचे असे म्हणणे आहे की,फास्टॅगचा वापर वाढल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन अगदी सोप्पे झाले आहे, खरंतर इलेक्ट्रॉनिक मोडच्या माध्यमातून टोल कलेक्शनच्या माध्यमातून टोल संचालक आणि वाहन चालक एकमेकांच्या संपर्कात येत नाहीत.