Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

दिल्ली येथून न्यूयार्कसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाला एमर्जेन्सी लॅन्डिंग करावे लागल्याची माहिती समोर आली आहे. या विमानाला अवघ्या 30 मिनिटाच्या आता लॅन्डिंग करावे लागले आहे, ज्यामुळे दिल्ली विमातळावर (Delhi Airport) एकच खळबळ माजली होती. या विमानाचे एमर्जेन्सी करण्यामागचे कारण समोर आले आहे. त्यानुसार, दिल्ली विमातळावरून उड्डाण घेतलेल्या या विमानात वटवाघूळ (Bat) आढळून आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकाने विमानाचे लॅन्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे अडीच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमानाने दिल्ली येथून न्यूयार्कसाठी उड्डाण घेतली होती. परंतु, 30 मिनिटानंतर या विमानात वटवाघूळ दिसले. त्यानंतर वैमानिकांनी तात्काळ विमान दिल्ली विमानतळावर लॅन्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, AI-105 DEL-EWR विमानासाठी लोकल स्टॅंडबाय एमर्जेन्सी घोषित करण्यात आली होती. ज्यानंतर विमानाचे लॅन्डिंग करावे लागले. परत येताच क्रू सदस्यांनी केबिनमध्ये वटवाघूळ पाहिले. या वटवाघूळाला बाहेर काढण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते, अशी माहिती एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. हे देखील वाचा- COVID-19 Pandemic मुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी 30 जून पर्यंत वाढवली

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, विमानात धुर केल्यानंतर मृत वटवाघूळाला बाहेर काढण्यात आले आहे. तसेच एअर इंडियाच्या B777-300ER एयरक्राफ्ट VT-ALM उड्डाण दिल्ली- न्यूयार्क दरम्यान केली जाते, अशी माहिती डीजीसीए अधिकाऱ्याने दिली आहे.