कोरोना व्हायरस संकटाच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील (International Flights) बंदी 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने यासंदर्भातील पत्रक जारी केले आहे. 23 मार्च 2020 पासून भारतात आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी होती. 31 मे रोजी ही बंदी हटवण्यात येणार होती. मात्र कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
DGCA ने आपल्या पत्रकात म्हटले की, 26-6-2020 मध्ये काढलेल्या पत्रकात बदल केले आहेत. आंरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर घातलेल्या निर्बंधांमध्ये वाढ केली गेली असून भारतातून बाहेर जाणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या विमानांवर 30 जून 2021 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. काही ठराविक मार्गांवर विशेष कारणांसाठी विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपरेशन्स आणि उड्डाणांवर हे निर्बंध नसल्याची माहिती DGCA ने दिली आहे.
DGCA Tweet:
— DGCA (@DGCAIndia) May 28, 2021
मागील वर्षी कोरोना संकटामुळे 23 मार्चपासून विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र 25 मे पासून देशांतर्गत विमान प्रवास नियमांच्या आधारे सुरु करण्यात आला होता. युके, युएसए आणि युएई यांसह 27 देशांसोबत air bubble pacts तयार करण्यात आले आहेत. (कॅनडाने भारत आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांच्या उड्डाणांवर 21 जूनपर्यंत घातली बंदी)
दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. लेटेस्ट अपडेटनुसार, आज देशात 1,86,364 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,660 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,59,459 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या देशात 23,43,152 सक्रीय रुग्ण असून 20,57,20,660 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.