Coronavirus Updates: जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा 76 लाखांच्या पार तर 425,000 हून अधिक लोकांचा COVID19 मुळे बळी- जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी
Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  फटका जगातील बहुतांश देशांना बसला असून तेथे रुग्णांसह बळींच्या आकड्यात वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 76 लाखांच्या पार गेला असून मृतांचा आकडा 425,000 हून अधिक झाला आहे. याबाबत जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (John Hopkins University) यांनी माहिती दिली आहे. युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग यांनी नव्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, शनिवारी सकाळ पर्यंत एकूण प्रकरणांची संख्या 7,632,377 झाली आहे. त्याचसोबत मृतांचा आकडा वाढून तो आता 425,000 वर पोहचला आहे.

सीएसएसई यांच्या नुसार, जगतील सर्वाधिक प्रकरणे 2,046,643 आणि 114,672 मृतांचा आकडा अमेरिकेत असून पहिल्या स्थानकावर आहे. त्यानंतर ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागत असून तेथे 828,810 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत.(68 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानला मोठा झटका; GDP ग्रोथ शून्याच्या खाली, 0.38 टक्क्यांनी घट)

कोरोनाची ही आकडेवारी आणखी काही देशांबाबत सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार रूस (510,761), भारत (297,535), ब्रिटेन (294,402), स्पेन (243,209), इटली (236,305), पेरू (214,788), फ्रान्स (193,220), जर्मनी (187,226), ईराण (182,525), तुर्की (175,218), चिली (160,846), मेक्सिको (139,196), पाकिस्तान (125,933) आणि सौदी अरब (119,942) येथील ही कोरोनाची आकडेवारी झळकवण्यात आली आहे. ब्राझील येथे 41,828 जणांचा बळी गेला असून तो ब्रिटेन पेक्षा अधिक आहे. तसेच 10 हजाराहून अधिक मृतांचा आकडा असलेले अन्य देश ब्रिटेन (41,5660. इटली (34,223), फ्रान्स (29,377), स्पेन (27,136) आणि मेक्सिको येथे (16,448) अशी आकडेवारी आहे.