US Woman | X

सिंधुदूर्ग (Sindhudurg) मध्ये 50 वर्षीय एक अमेरिकन महिला जंगलात झाडाला बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळली होती. पोलिसांनी या महिलेने स्वतःहून झाडाला बांधून घेतलं असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अन्य कोणीही सहभागी नसल्याचं म्हटलं आहे. या महिलेचं मानसिक संतुलन स्थिर नसल्याचं सांगितलं आहे. सध्या रत्नागिरी मध्ये मेंटल हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन महिलेने हा असा प्रकार पहिल्यांदा केलेला नाही. गोवा मध्ये येण्यापूर्वी तामिळनाडूतही तिने अशाच प्रकारे स्वतःला बांधून घेतले होते. 27 जुलैला ही महिला सिंधुदुर्गामध्ये अशाप्रकारे बांधलेल्या अवस्थेमध्ये रडताना आढळली होती. पोलिसांनी तिची सुटका करून हॉस्पिटल मध्ये तिला दाखल केले होते.

3 ऑगस्टला पोलिसांना स्टेटमेंट देताना तिने आपण भ्रमिष्ट असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान तिला पतीने इंजेक्शन देऊन जंगलात बांधून मरायला सोडलं असे सांगितलं पण आता प्रत्यक्षात तिने आपला पती नसल्याचं म्हटलं आहे. महिलेची सुटका केल्यानंतर तिच्या बॅगेमध्ये एक चिठ्ठी आढळली ज्यामध्ये तिला पूर्व पतीने झाडाला बांधलं असल्याचं म्हटलं आहे. यावरून पूर्वपतीवर तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. Maharashtra Shocker: सिंधुदुर्गच्या जंगलात सापडलेली अमेरिकन महिला, माजी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, पाहा व्हिडिओ. 

अमेरिकन  महिलेने स्वतःलाच झाडाला घेतलं बांधून

महिलेने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, तिने 3 टाळी आणि लोखंडी साखळी आणली होती. ज्याने तिने स्वतःला झाडाला बांधून घेतलं. ही घटना सोनुर्ली गावातील जंगलात झाली आहे. ट्रेनने प्रवास करून ती महाराष्ट्र गोवा सीमेवरील गावात पोहचली होती. मुंबई-गोवा प्रवासादरम्यान ट्रेन मध्येच बराच वेळ थांबली होती तेव्हा ही महिला मध्येच उतरून जंगलात गेली.

अमेरिकेमध्ये या महिलेची आई राहते पण अद्याप कोणीही पोलिसांकडे तिची तेथून विचारणा केलेली नाही. या महिलेकडे अमेरिकेचा पासपोर्ट आहे तर तामिळनाडूच्या पत्त्याचं आधार कार्ड आहे. तिचा व्हिसा संपलेला आहे.

महिलेची सुटका केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक उपचार करून तिला सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला सिंधुदुर्गच्या ओरोस येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेत पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत.