Udit Narayan Building Catches Fire (फोटो सौजन्य - X/@anupsjaiswal)

Udit Narayan Building Catches Fire: गायक उदित नारायण (Singer Udit Narayan) यांच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये आग (Fire) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम येथील शास्त्रीनगर येथील स्कायपॅन अपार्टमेंटला रात्री 9.15 वाजता अचानक आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. विकी लालवानी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली. विद्युत उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट (Short Circuit In Electrical Equipment) झाल्याने ही आग लागली. उदित नारायण यांच्या स्कायपॅन इमारतीला आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाली. इमारतीतील एक अपार्टमेंट आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. तथापी, अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी बराच वेळ लागला.

इमारतीच्या 11व्या मजल्यावर लागली आग -

उदित नारायण यांच्या इमारतीच्या 11व्या मजल्यावर ही आग लागली. गायक त्याच इमारतीच्या 9 व्या मजल्यावर राहतो. घराला आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. काही विद्युत उपकरणे खराब झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Aditya Narayan-Shweta Agarwal’s Wedding Photos: आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांच्या विवाहसोहळ्यातील खास फोटोज!)

उदित नारायण आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप -

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दावा केला की, कुटुंबाने दिवा लावला होता, ज्याच्या ज्वालाने जवळच्या पडद्यांना आग लागली. उदित नारायण आणि त्यांचे कुटुंबीय सध्या सुखरूप आहेत मात्र या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर इमारतीचा रस्ता बंद करण्यात आला आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. (हेही वाचा - Udit Narayan on Son Aditya Narayan: लोक नेपोटिझमवर बोलतात मात्र, मला माझ्या मुलाने डिजिटल युगात लाँच केलं - उदित नारायण)

उदित नारायण यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग, पहा व्हिडिओ - 

यापूर्वी शानच्या इमारतीत आग -

या घटनेपूर्वी 25 डिसेंबर रोजी गायक शानच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली होती. मुंबईतील वांद्रे येथील फॉर्च्युन एन्क्लेव्ह इमारतीला भीषण आग लागली होती. सकाळी 12.30 च्या सुमारास सातव्या मजल्यावर आग लागली होती. इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अडीच तास लागले होते.