Aditya Narayan-Shweta Agarwal’s Wedding Photos: आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांच्या विवाहसोहळ्यातील खास फोटोज!
Aditya Narayan-Shweta Agarwal’s Wedding (Photo Credits: Instagram)

Aditya Narayan-Shweta Agarwal’s Wedding: बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण (Aditya Narayan) 1 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) सोबत विवाहबद्ध झाला. सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील खास फोटोज जोरदार व्हायरल झाले. या फोटोंमध्ये आदित्य-श्वेता दोघेही अत्यंत खूश दिसत होते. आता या दोघांच्या विवाहसोहळ्यातील नवे फोटो समोर आले आहेत. यात आदित्य आणि श्वेताचा खास अंदाज पाहायला मिळत आहेत. विवाहसोहळ्यातील हे खास फोटोज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (आदित्य नारायण वरात घेऊन निघाला आपली 'दुल्हनियां' श्वेता अग्रवाल ला घ्यायला, पाहा धमाल व्हिडिओ आणि फोटोज)

यात आदित्यने क्रिम रंगाची शेरवानी आणि श्वेताने त्याच रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. दोघांच्याही गळ्यात वरमाला दिसत आहेत. फोटोत दोघांमधील बॉन्डची झलक पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे काही फोटोजमध्ये आदित्य-श्वेताचा रोमांटिक अंदाजही पाहायला मिळत आहे.

पहा फोटोज:

यापूर्वी तिलक समारंभ, बारात या सोहळ्यांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता हे नवे फोटोज समोर येत आहेत. विशेष म्हणजे काल उदित नारायण यांचा वाढदिवस होता. त्यामुळे नारायण कुटुंबियांसाठी सेलिब्रेशनची डबल संधी होती. दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. मात्र रिसेप्शनसाठी बॉलिवूडमधील स्टार मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे.