Aditya Narayan's Baraat Photos and Video: आदित्य नारायण वरात घेऊन निघाला आपली 'दुल्हनियां' श्वेता अग्रवाल ला घ्यायला, पाहा धमाल व्हिडिओ आणि फोटोज
Aditya Narayan (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि उत्कृष्ट गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आज त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूडमधील शाही विवाह सोहळ्यांपैकी हा एक आहे. हे लग्न जरी साध्या पद्धतीने मंदिरात होणार असले तरीही उद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन होणार आहे. जुहूच्या इस्कॉन मंदिरात (Iskcon Temple) हे दोघे लग्न करणार आहेत. त्यासाठी बोहल्यावर आपल्या दुल्हनियां श्वेता अग्रवाल ला घेण्यासाठी निघाला आहे. त्याच्या वरातीचे व्हिडिओ आणि फोटोज सध्या व्हायरल होत आहे.

या फोटो आणि व्हिडिओज मध्ये आदित्य आपले वडिल उदित नारायण आणि आईसह मोजक्या नातेवाईकांसह घरातून निघाले आहेत. येथे त्याची व-हाड मंडळी नाचण्यात मश्गुल आहेत.

Aditya Narayan Wedding (Photo Credits: Yogen Shah)
Aditya Narayan Wedding (Photo Credits: Yogen Shah)

आदित्य नारायण ने क्रिम रंगाची शेरवानी घातली असून डोक्यावर पगडी घातली आहे आणि डोळ्यांवर काळा चश्मा घातला आहे.हेदेखील वाचा- Aditya Narayan and Shweta Agarwal’s Tilak Ceremony: आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांचा तिलक सोहळा संपन्न; पहा फोटोज आणि व्हिडिओज

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

तर दुसरीकडे श्वेता अग्रवालही छान नटली असून आपल्या स्वप्नातील राजकुमाराशी विवाहबंधनात अडकण्यास उत्सुक आहे. तिचे नववधूचा लूक पाहून तोंडातून 'व्वा' असा एकच शब्द निघेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

वडिल उदित नारायण यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी पंतप्रधान मोदी, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, धर्मेंद्र, माधुरी दीक्षित सारख्या अनेक दिग्गजांना निमंत्रित केले आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे हे सर्वच लग्नास येतील की नाही हे सांगणे थोडे अवघड आहे. त्यामुळे कोण कोण आदित्यच्या रिसेप्शनला येणार हे उद्याच कळेल.