Udit Narayan on Son Aditya Narayan: लोक नेपोटिझमवर बोलतात मात्र, मला माझ्या मुलाने डिजिटल युगात लाँच केलं - उदित नारायण
उदित नारायण आणि आदित्य नारायण (Photo Credits: Instagram)

Udit Narayan on Son Aditya Narayan: गायक उदित नारायण (Udit Narayan) यांनी संगीत क्षेत्रातील डिजिटल युगात पदार्पण केलं आहे. यासाठी त्यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) यांनी मदत केली आहे. त्यामुळे उदित नारायण यांनी आदित्यचे आभार मानले आहेत. चार दशकाहून अधिक काळ बॉलीवूड प्लेबॅक क्षेत्रात काम राज केल्यानंतर आपलं नवीन गाण 'तेरे बगैर' यूट्यूबवर लाँच केलं आहे.

यासंदर्भात बोलताना उदित नारायण यांनी म्हटलं आहे की, मी आदित्यजवळ डिजिटल युगात पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला काही माहित पडण्याअगोजर त्याने सर्व काही सेट करून ठेवलं होतं. मला केवळ त्याच्या स्टूडिओ सेटअपमध्ये येऊन गाणं रेकॉर्ड करायचं होतं. मला गर्वाने सांगाव वाटतं की, सध्या लोक नेपोटिज्मवर बोलत आहेत. मात्र, मला माझ्या मुलाने डिजिटल युगात लाँच केलं. माझ्यावर विश्वास ठेवा, त्याने हे सर्व त्याच्या मेहनतीच्या कमाईवर केलं आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझा गर्व आहे, अशा शब्दांत उदित नारायण यांनी आपला मुलगा आदित्यविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. (हेही वाचा - Kangana Ranaut: शिवसेना सोबत भिडल्यानंतर आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची कंगना रनौत घेणार भेट)

दरम्यान, हे गाणं श्रेयस पुराणिक यांनी कंपोज केलं असून प्रशांत इंगोले यांनी या गाण्याचं लेखन केलं आहे. या गाण्यात आदित्यची भूमिका दाखवण्यात आली आहे. पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या उदित नारायण यांनी 80 च्या दशकात गाणं गायला सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटाची निर्मीतीदेखील केली. त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.