Kangana Ranaut: शिवसेना सोबत भिडल्यानंतर आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची कंगना रनौत घेणार भेट
कंगना रनौत आणि भगत सिंग कोश्यारी (Photo Credits- Instagram/ Twitter)

Kangana Ranaut to Meet Governor Bhagat Singh Koshyari: बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार यांच्यामध्ये तणाव अधिक वाढत आहे. याच कारणास्तव आता रविवारी कंगना रनौत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याची भेट घेणार आहे. असे मानले जात आहे की, कंगना मुंबई येथून जाण्यापूर्वी राज्यपालांची भेट घेत त्यांना राज्य सरकार सोबत सुरु असलेल्या तणावाबद्दल सांगणार आहे. रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता ही राज्यपालांना भेटणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबरला कंगना हिला शहराच्या बाहेर जायचे आहे.('तुम्ही कुख्यात गुंड दाऊदचे घर तोडायला गेला नाहीत पण कंगनाचे कार्यालय तोडायला गेलात'; देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेवर टिकास्त्र)

कंगना हिच्या टीमने आयएनएस यांना असे म्हटले आहे की, सुरक्षा प्रोटोकॉलच्या कारणास्तव ती कुठे प्रवास करणार आहे याबद्दल आम्ही खुलासा करु शकत नाही. कंगना आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर तिने एक अपमानकारक टिप्पणी सुद्धा केली होती. कंगना हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीर सोबत करत पोलिसांना खोटे असल्याचे म्हटले होते.(Kangana Ranaut Likens CM Uddhav Thackeray to 'Ravana': कंगना रनौतचा महाराष्ट्र सरकार वर मराठीमधून हल्ला; सीएम उद्धव ठाकरे यांचे 'रावण'च्या रूपातील चित्र केले पोस्ट See Tweet)

यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कथित रुपात असे म्हटले होते की, अभिनेत्रीला मुंबईत राहण्याचा कोणताच अधिकार नाही आहे. दुसऱ्या बाजूला कंगना हिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केल्यानंतर महापालिकेने तिच्या ऑफिसच्या इमारतीवर हतोडा चालवल्याचे दिसून आले होते. या दरम्यान कंगना 9 सप्टेंबरला केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या Y प्लस पद्धतीच्या सुरक्षिततेत मुंबईत दाखल झाली होती.