'तुम्ही कुख्यात गुंड दाऊदचे घर तोडायला गेला नाहीत पण कंगनाचे कार्यालय तोडायला गेलात'; देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेवर टिकास्त्र
Kangana Ranaut And Devendra Fadnavis (Photo Credit: Instagram/PTI)

कंगना रनौत (Kangana Ranaut) विरुद्ध शिवसेना (Shivsena) हा वाद सध्या चांगलाच पेटला असून कंगनाचे मुंबईतील पाली हिल मधील ऑफिसचा बराचसा भाग BMC ने तोडल्याने हे प्रकरण आता चांगलच गाजतय. तर दुसरीकडे कंगनाला मुंबईत येण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 'Y'दर्जाची सुरक्षा दिल्याने राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार हा वाद देखील चांगलाच उफाळून आला आहे. यामुळे आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या प्रकरणाबाबत मिडियाकडून विचारण्यात आल्यानंतर 'कंगना ही कोणी राजकीय नेता नाही. तुम्ही कुख्यात गुंड दाऊदचे घर तोडायला गेला नाहीत पण कंगनाचे कार्यालय तोडायला गेलात' अशा शब्दात स्पष्टीकरण देत शिवसेनेला टोला लगावला आहे.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवरही तोफ डागाळली आहे. 'राज्य सरकारला वाटत आहे की कोरोनाची लढाई संपली कंगनाची लढाई बाकी आहे. तर असं नसून राज्यात वाढत जाणा-या कोरोनाच्या केसेस याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे असा राज्य सरकारला टोला लगावला आहे. तसेच हे कंगना हे प्रकरण राज्य सरकार (शिवसेना) ने वाढवले स्वत: मूर्खासारखं वागून त्याच खापर भाजपावर फोडायचे असं चालू असल्याचेही ते म्हणाले. Ramdas Athawale Met Maharashtra Governor: कंगना रनौत ला कार्यालय तोडफोड प्रकरणी नुकसान भरापाई देण्यात यावी; रामदास आठवले यांची राज्यपालांकडे मागणी

तसेच कंगनाही कोणी राजकीय नेता नसून तुम्ही दाऊदचे घर तोडायला जात नाही मात्र कंगनानेच ऑफिस तोडायला गेलात. याचाच अर्थ राज्य सरकार आपल्या सोयीनुसार हे प्रकरण हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.