Ramdas Athawale Met Maharashtra Governor: कंगना रनौत ला कार्यालय तोडफोड प्रकरणी नुकसान भरापाई देण्यात यावी; रामदास आठवले यांची राज्यपालांकडे मागणी
Ramdas Athawale (Photo Credits-ANI)

Ramdas Athawale Met Maharashtra Governor: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut's) मुंबईतील कार्यालयाची मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी तोडफोड केली. याप्रकरणी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यावेळी आठवले यांनी कंगनाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यांसदर्भात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, 'मुंबईमध्ये कंगना रनौतच्या कार्यालयाची जी तोडफोड झाली, यासंदर्भात मी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत चर्चा केली. कंगनाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. बीएमसीने ज्या पद्धतीने कंगनाच्या संपत्तीचे नुकसान केले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. कंगनाला न्याय मिळाला पाहिजे,' असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Kangana Ranaut on Sonia Gandhi: BMC कडून ऑफिसवर झालेल्या कारवाईनंतर कंगना रनौत हिने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विचारले 'हे' प्रश्न (View Tweet))

बीएमसीने कंगना रणौतचं मुंबईतील कार्यालय उद्ध्वस्त केलं. कंगना रणौतच्या ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलं असल्याचं सांगत बीएमसीने तिच्या कार्यावर जेएसबी चालवला. कंगनाने 48 कोटी रुपये खर्च करून या कार्यालयाची जागा खरेदी केली होती. कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबईत येण्याचं आव्हान दिलं होतं. त्याच दिवशी बीएमसीने सकाळी तिच्या ऑफिसचा काही भाग तोडला होता.