Kangana Ranaut on Sonia Gandhi:  BMC कडून ऑफिसवर झालेल्या कारवाईनंतर कंगना रनौत हिने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विचारले 'हे' प्रश्न (View Tweet)
Kangana Ranaut and Sonia Gandhi (Photo Credit: Instagram/ PTI)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. बीएमसीने (BMC) कारवाई करत कंगना रनौत हिच्या बंगला आणि ऑफिसच्या अवैध कामावर हातोडा मारला. मुंबई महानगरपालिकेच्या या तोडक कारवाईमुळे तिचे तब्बल 2 कोटींचे नुकसान झाले, असे तिचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणावर कंगना रनौत हिने आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ट्विट करत प्रश्न विचारले आहेत. "माननीय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी जी, तुम्ही एक महिला असूनही मला महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली वागणूकीचा तुम्हाला त्रास होत नाही? डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेची तत्त्वे पाळण्याची विनंती तुम्ही तुमच्या सरकारला करू शकत नाही?"

पुढच्या ट्विटमध्ये कंगना लिहिते, "पाश्चिमात्य देशात तुम्ही लहानाच्या मोठ्या झाल्यात आणि आता भारतात राहता. तुम्हाला कदाचित महिलांचा संघर्ष ठाऊक असेल. जेव्हा तुमचे सरकार महिलांना त्रास देत आहे आणि कायदा व सुव्यवस्थेची एकूणच चेष्टा करत असता तुमच्या या शांततेची इतिहासात नोंद केली जाईल. मला आशा आहे तुम्ही या प्रकरणाची दखल घ्याल."

Kangana Ranaut Tweet:

"एक दिवस शिवसेना गटबंधन करेल आणि काँग्रेस होईल, हे बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे भय होते. सध्या त्यांच्या पक्षाची परिस्थिती पाहता त्यांना नेमके काय वाटत असेल, मला जाणून घ्यायचे आहे," असं लिहित कंगना हिने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे हे तिचे अत्यंत आवडते व्यक्तीमत्त्व असल्याचेही तिने म्हटले आहे. (Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray: तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल - कंगना रनौत)

पहा व्हिडिओ:

कंगना रनौत हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर शिवसेना आणि तिच्यातील वाद शिगेला पोहचला. बीएमसीने तिच्या ऑफिस, बंगल्याची तोडफोड केली, त्यानंतर कंगना रनौत हिने मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत लवकरच तुझे गर्वहरण होईल असं म्हणत एक व्हिडिओ शेअर केला होता.