Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray: तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल - कंगना रनौत
Kangana Ranaut, CM Uddhav Thackeray (PC - Facebook)

Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray: अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने शिवसेना आणि कंगनामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. अशातचं आता कंगनाने आपल्या ट्विटरवरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधल आहे. 'तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल,' अशा शब्दांत कंगनाने अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

कंगनाने आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल. माझ तोंड बंद करू शकता, परंतु, माझ्यानंतर माझा आवाज लाखों लोकांमध्ये दिसेल. तेव्हा किती लोकांचे तोंड बंद कराल? किती लोकांचे आवाज दाबाल? कधीपर्यंत सत्यापासून दूर जाणार? तुम्ही केवळ वंशवादाचा एक नमुना आहात.' (हेही वाचा - Imtiaz Jaleel Supports CM Uddhav Thackeray: AIMIM आमदार इम्तियाज जलील यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा; कंगनाला भाषा सांभाळून वापरण्याचा सल्ला)

याशिवाय कंगनाने दुसऱ्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे की, 'श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका,' असा शब्दांत कंगनाने शिवसेनेवर टीका केली आहे.