Imtiaz Jaleel Supports CM Uddhav Thackeray (Photo Credits: File Image)

Shivsena Vs Kangana: अभिनेत्री कंंगना रनौत (Kangana Ranaut) हिने काल BMC ने आपले वांंद्रे येथील ऑफिस तोडल्याच्या रागातुन मुंंबईत दाखल होताच एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात तिने मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत "मी तुझा घमंंड मोडल्याशिवाय राहणार नाही"  अशा भाषेत संंताप केला होता. अनेकांंनी कंंगनाच्या कार्यालयाची झालेली वाताहात पाहता हा संताप योग्य असल्याचे सुद्धा म्हंंटले होते मात्र काहीही असले तरी राज्याच्या मुख्यमंंत्र्यांंचा एकेरी उल्लेख करणे गैर आहे यावर सर्वांचे एकमत होते. याच मताने एआयएमआयएमचे (AIMIM MLA)  आमदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel)  यांंनी सुद्धा एक खास ट्विट करुन मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंचे समर्थन केले आहे. तसेच कंंगनाला सुद्धा आपल्या भाषेवर लगाम ठेवण्याचा सल्ला वजा इशारा या ट्विट मधुन देण्यात आला आहे.

Kangana Ranaut Office Demolition: हा लोकशाहीचा मृत्यु म्हणत कंंगना रनौत ने शेअर केले तोडफोड झालेल्या ऑफिस मधील Video, इथे पाहा

इम्तियाज जलील यांंनी कंंगनाच्या व्हिडिओनंंतर ट्विट करत म्हंंटले की, "आमचे शिवसेनेसोबत राजकीय मतभेद नक्कीच आहेत मात्र उद्धव ठाकरे हे माझे आणि संपुर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री आहेत अशावेळी त्यांना कोणीही ऐरागैरा उठुन काहीही बोलेल हे चालणार नाही त्यामुळे कंंगनाने सुद्धा स्वतःची भाषा सांभाळुन वापरावी".

IMtiaz Jaleel Supports CM Uddhav Thackeray Tweet

दरम्यान, कंंगनाच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीवरुन आज दुपारी तीन वाजता मुंंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे. तत्पुर्वी काल न्यायालयाने बीएमसीला कंंगनाच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांंगितले आहे. BMC ने कंंगनाला सुनावलेली नोटिस आणि कार्यालयात केलेली तोडफोड बेकायदेशीर असुन त्यासाठी सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कंंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी हे करणार आहेत.