कंंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या वांंद्रे (Bandra) येथील कार्यालयात BMC कडुन आज सकाळी तोडफोड करण्यात आली. काही वेळापुर्वी कंंगनाने या तुटलेल्या ऑफिसचे काही व्हिडिओ आपल्या ट्विटरवरुन शेअर केले आहेत, या व्हिडिओ मध्ये ऑफिस ची पुर्णपणे वाताहात झाल्याचे दिसुन येत आहे. हा लोकशाहीचा मृत्यु आहे असे म्हणत कंंगनाने #DeathOfDemocracy अशा हॅशटॅग सह हे व्हिडिओ शेअर केले आहेत. काहीच वेळापुर्वी कंंगना मुंंबईत दाखल झाली असुन ती सध्या तरी आपल्या खार येथील घरी पोहचलेली आहे काही वेळाने ती वांद्रे येथे जाउन आपल्या तुटलेल्या ऑफिसची पाहणी करणार असल्याचे सुद्धा समजतेय. Kangana Ranaut Reaches Mumbai: अभिनेत्री कंगना रनौत मुंबई शहरात दाखल; Y+ आणि मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत पोहोचली घरी (Watch Video)
काही वेळापुर्वी कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी कंंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयात पाहणीसाठी गेले असता त्यांंनी या तोडफोडीत कंंगनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची माहिती दिली होती. बीएमसीच्या अतिउत्साही कर्मचार्यांंनी कंंगनाच्या ऑफिस मधील नळ, फर्निचर ते सगळ्याची तोडफोड केली आहे या नुकसानासाठी महाराष्ट्र सरकार कडे उद्या मोबदला मागणार आहोत असेही कंंगनाच्या वकिलांंनी म्हंटले आहे.
Kangana Ranaut Tweet
#DeathOfDemocracy pic.twitter.com/JVj3VN40x3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
#DeathOfDemocracy pic.twitter.com/cpv0A1TJjy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
#DeathOfDemocracy pic.twitter.com/Ts5GP9deOh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
आज सकाळी बीएमसीचे कर्मचारी या कार्यालयाची तोडफोड करायला आले असताना कंंगनाने त्यावेळचे सुद्धा काही फोटो शेअर करत बाबर सेना म्हणुन कर्मचार्यांंचा उल्लेख केला होत. तसेच हे कार्यालय आपल्यासाठी राम मंंदिराप्रमाणे होते त्याला बाबर सेनेने तोडले असले तरी मी ते पुन्हा उभारेन असेही कंंगनाने ट्विट केले होते.
कंंगना रनौत ट्विट
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
दरम्यान सध्या कंंगनाने मुंंबईत पोहचुन पहिला व्हिडिओ आपल्या घरातुन शेअर केला आहे. ज्यात तिने आज माझं घर तुटलंंय पण उद्धव ठाकरे उद्या तुमचा घमंड तोडेन, तुम्ही मला काश्मीर पंंडितांंना कसे वाटले असेल याची मुंंबईतच जाणीव करुन दिलीत त्यासाठी धन्यवाद असे म्हंंटले आहे.