Kangana Ranaut Office Demolition: कंंगना रनौत च्या ऑफिस चे मोठे नुकसान, सरकारला मोबदला मागणार- वकील रिझवान सिद्दिकी
Kangana Ranaut Office Demolition, Lawyer Rizwan Siddiqui (Photo Credits: ANI, Twitter)

कंंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या वांंद्रे (Bandra) येथील कार्यालयात BMC कडुन आज सकाळी तोडफोड करण्यात आली. यावेळी वास्त्विक जरी कारवाई करायची असेल तेव्हा वास्तु तोडल्यास समजु शकतो मात्र बीएमसीच्या अतिउत्साही कर्मचार्‍यांंनी कंंगनाच्या कार्यालयातील वस्तु सुद्धा तोडुन टाकल्या आहेत. अगदी भांंड्यांंपासुन ते फर्निचर ते बाथरुम मधील नळ असं सगळं तोडण्यात आलं आहे. ही मुळातच गुंंडगिरी असुन या झालेल्या नुकसानासाठी कंंगनाच्या वतीने उद्या मुंंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार कडुन मोबदला मागणार आहे अशी प्रतिक्रिया कंंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांंनी दिली आहे. मुंंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज बीएमसीला या कारवाई प्रकरणी उत्तर दाखल करण्यास सांंगितले आहे. ज्यावर उद्या कंंगना विरुद्ध बीएमसी अशी सुनावणी दुपारी 3 वाजता पार पडणार आहे. मातोश्री पासुन हाकेच्या अंतरावरील अवैध बांंधकाम सरकारी जावयांंचे असावे, भाजप आमदाराची फेसबुक पोस्ट वाचा

काही वेळापुर्वी कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी कंंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयात पाहणीसाठी गेले असता त्यांंनी या तोडफोडीत कंंगनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. तर या कार्यालयाशी आपल्या भावना जोडलेल्या होत्या असे सांंगत कंंगनाने सुद्धा काही वेळापुर्वी ट्विट्स केले होते.

ANI ट्विट

कंंगना रनौत ट्विट 

दरम्यान , बीएमसीकडुन कंंगनाला देण्यात आलेली नोटिस ही पुर्णतः बेकायदेशीर असल्याचे सुद्धा रिझवान सिद्दकी यांंनी म्हंंटले आहे. तसेच बीएमसी ची कारवाई सुडबुद्धीने आणि तिला उसकवण्यसाठी होत असल्याचे ही सिद्दिकी यांंनी म्हंंटले होते.दुसरीकडे कंंगना सध्या खार येथील निवासस्थानी पोहचली असुन ती काही वेळाने आपल्या वांद्रे येथील कार्यालयाला सुद्धा भेट देणार असल्याचे समजतेय.