Nitesh Rane, Kangana Ranaut, Atul Bhatkhalkar (photo Credits: Facebook)

मुंंबईला पाक व्याप्त काश्मीर (POK) म्हंंटल्यावर सुरु झालेला महाराष्ट्र सरकार (Maharashgra Government) विरुद्ध कंगना रनौत (Kangana Ranaut)  हा वाद आता आणखीनच पेटला आहे. आज सकाळी कंगनाच्या मुंबई मधील कार्यालयामध्ये बुलडोझर आणि अन्य हत्यारांचा वापर करून तोडफोड करण्यात आली तर खार येथील तिच्या निवासस्थानाबाहेर नोटीस अवैध बांंधकाम असल्याची नोटिस लावण्यात आली आहे. कंंगनाच्या अपार्टमेंटच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, आजूबाजूचे 100 मीटरपर्यंतचे सर्व रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहे. दरम्यान याच पार्श्वभुमीवर भाजप आमदारांंनी (BJP MLA) सरकारवर टीका करत पोस्ट्स केले आहेत.

काल भाजपचे आमदार व मुंंबई प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांंनी कंंगनाचं घर दिसतं पण मातोश्री (Matoshree) पासुन हाकेच्या अंतरावरील अवैध बांंधकामं दिसत नाहीत बहुधा हे काम सरकारी जावयांंचे असावे असे म्हणत फेसबुकला पोस्ट केली आहे.

अतुल भातखळकर पोस्ट 

दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांंनी सुद्धा सबका टाईम आयेगा असे म्हणत ट्विट केले आहेत. कायदा हा सर्वश्रेष्ठ पण तो सगळ्यांंसाठी समान असेल अशी अपेक्षा आता बीएमसी खानच्या मन्नत मध्येही जाणार का अर्थात नाही तितकी हिंंमत ते कसे करतील असे म्हणत नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.

नितेश राणे ट्विट

दरम्यान, सध्या कंंगना रनौत हिच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर मुुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला उत्तर देण्यास सांंगितले आहे. बीएमसीने आपले उत्तर दाखल केल्यावर यावर न्यायालय निर्णय देणार आहे.