Kangana Ranaut Office Demolition: कंगना रनौत च्या कार्यालयामध्ये अवैध बांधकामावर बीएमसी कडून हातोडा, बंगल्यावरही कारवाई करणार असल्याची बीएमसी  अधिकार्‍यांची माहिती
कंगनाच्या संपतीवर बीएमसीची कारवाई (Photo Credits: Yogen Shah)

मुंबईची तुलना सुरूवातीला पाकव्याप्त कश्मीर सोबत केल्यानंतर कंगना रनौतने (Kangana Ranaut) मुंबईकरांशी पंगा घेतला आहे. दरम्यान आता बीएमसीकडून (BMC) देखील तिच्या अवैध बांधकामांवर लक्ष ठेवलं आहे. आज सकाळी कंगनाच्या मुंबई मधील कार्यालयामध्ये पालिकेने तोडक कारवाई केली आहे. तर मुंबईमध्ये तिच्या निवासस्थानी देखील नोटीस बजावली आहे. यामध्ये अवैध बांधकामावर कागदपत्र सादर न केल्याने ही कारवाई केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान आज वांद्रे येथील  मणिकर्णिका कार्यालयात बुलडोझर आणि अन्य हत्यारांचा वापर करून तोडफोड झाली आहे.

हिमाचल प्रदेश मधून मुंबईकडे निघालेल्या कंगना रनौतने ट्वीटरच्या माध्यामातून या तोडक कारवाईचे फोटो देखील प्रसिद्ध केले आहेत. त्याला तिने 'पाकिस्तान' असं कॅप्शन दिले आहे. तसेच बीएमसी अधिकार्‍यांच्या कारवाईची तुलना तिने 'बाबर सेना' म्हणून केली आहे. त्याबाबतचे ट्वीट्स कंगनाने मुंबईच्या परतीच्या प्रवासादरम्यान केले आहेत.  आज कार्यालयानंतर तिच्या बंगल्यावरही कारवाई होऊ शकते. त्याची माहिती बीएमसीने दिली आहे.  Kangana Ranaut हिला मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाचे काम थांबविण्याची BMC कडून नोटिस

कंगनाची प्रतिक्रिया 

 

दरम्यान कंगनाच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याच्या विरोधात तिचे वकील कोर्टात पोहचले आहे. दरम्यान आज 12.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल. कंगनाच्या वकिलाने बीएमसीच्या नोटीशीला उत्तर देत ही कारवाई सुडबुद्धीने आणि तिला उसकवण्यसाठी होत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.