Kangana Ranaut हिला मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाचे काम थांबविण्याची BMC कडून नोटिस
Kangana Ranaut Pali hill Office (Photo Credits: FB/Yogen Shah)

आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. काल (7 सप्टेंबर) ला BMC अधिका-यांनी अचानक तिच्या मुंबईतील पाली हिल (Pali Hill) येथील कार्यालयाची पाहणी केल्यानंतर आज तिला या कार्यालयाचे काम थांबविण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. BMC त्या आशयाची नोटिस तिच्या या ऑफिसच्या गेटबाहेर लावली आहे. दरम्यान काल BMC अधिका-यांचे अचानक असे येण्याने कंगनाने संताप व्यक्त केला असून आपले स्वप्न लवकरच तुटणार आहे असे सांगत गंभीर दावा केला आहे. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.

कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद आता चांगलाच पेटला असून त्यात कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर BMC अधिकारी अचानक पाहणी करण्यास आल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. तिच्या कार्यालयाच्या गेटवर या कार्यालयाचे काम तात्काळ थांबवावे अशी आशयाची नोटीस BMC कडून लावण्यात आली आहे. कंगना रनौत हिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाची BMC अधिका-यांनी केली पाहणी, अभिनेत्री ने ट्विट मधून केला 'हा' गंभीर दावा

दरम्यान कंगना उद्या मुंबईत येणार असून तिच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे. तर दुसरीकडे कंगनाने माफी मागावी तर मी विचार करेन असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. तर 'मी 9 सप्टेंबरला मुंबईत येणार असून कुणाला काय करायच आहे ते करा' असे आव्हान कंगनाने केले आहे. त्यामुळे थोडक्यात हे प्रकरण आता आणखी काय वळणं घेत हे कंगना उद्या मुंबईत आल्यावरच कळेल.

'मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या व्यक्तीला 'Y' दर्जाची सुरक्षा दिली जाणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे' असे सांगत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केंद्रावर टिका केली आहे.