कंगना रनौत हिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाची BMC अधिका-यांनी केली पाहणी, अभिनेत्री ने ट्विट मधून केला 'हा' गंभीर दावा
Kangana Ranaut Pali Hill Office (Photo Credits: Twitter)

कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) हा वाद आता चांगलाच रंगला असून कंगनाने आपण 9 सप्टेंबरला मुंबईत येणार असून कुणाला काय करायचय ते करा असे आव्हान दिले आहे. दरम्यान आज अचानक मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिका-यांनी कंगनाच्या मुंबईतील पाली हिल (Pali Hill) येथील कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला. मात्र BMC अधिका-यांचे अचानक असे येण्याने कंगनाने संताप व्यक्त केला असून आपले स्वप्न लवकरच तुटणार आहे असे सांगत गंभीर दावा केला आहे. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हे माझे मर्णिकर्णिका फिल्म्स चे ऑफिस आहे. जे मी 15 वर्षांच्या मेहनतीने उभे केले आहे. हे माझे स्वप्न होते मात्र लवकरच हे स्वप्न तुटणार आहे' असे सांगत उद्या BMC चे लोक हे ऑफिस तोडणार असल्याचा दावा कंगनाने केला आहे.

हेदेखील वाचा- Sanjay Raut on Kangana Ranaut: शिवसेनेवर टिका करणा-या कंगना रनौतला अप्रत्यक्षपणे संजय राऊतांनी दिले चोख उत्तर; वाचा ट्विट

इतकच नव्हे तर कंगनाने हे अधिकारी पाहणी करायला आले असतानाचा व्हिडिओ शेअर करुन 'त्या मॅडमच्या कारनाम्यांमुळे सर्वांना परिणाम भोगावे लागणार' असे महापालिकेचे अधिकारी म्हणत असल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर माझे ऑफिस अधिकृत असून त्यासंबंधीचे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. मात्र BMC ने ते अनधिकृत दाखवून उद्या ते उद्ध्वस्त करणार असल्याचे तिने सांगितले आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी जबरदस्तीने माझ्या ऑफिसची पाहणी करायला सुरुवात केली. त्याचबरोबर माझ्या ऑफिस शेजारील लोकांवरही दबाव टाकला असेही ती म्हणाली.