Kangana Ranaut to Get Y Level Security:  अभिनेत्री कंगना रनौत ला केंद्र सरकार कडून 'Y' दर्जाची सुरक्षा;  ट्वीट करत मानले अमित शाह यांचे आभार
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने काही दिवसांपूर्वी मुंबई शहराची पाकव्याप्त कश्मीर सोबत तुलना केल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना पक्षाने देखील कंगनाचं थोबाड फोडल्याशिवय राहणार नाही अशाप्रकारची वक्तव्य केली आहेत. शिवसेनेच्या महिला आघाडीकडून देखील पोस्टर्स फाडण्यात आली. त्यानंतर आता 9 सप्टेंबरला मुंबईत येणार्‍या कंगनाला केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल अशी सुत्रांची माहिती आहे अशाप्रकारचे ट्वीट ANI कडून करण्यात आले आहे. दरम्यान PTI च्या वृत्तानुसार, कंगनाला Y+  दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यामध्ये 11 सुरक्षा रक्षकांचा समावेश असेल. 1-2 कमांडो असतील आणि उर्वरित पोलिस असतील.

कंगनाने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सांगत काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'ज्यांना मुंबई मध्ये राहणं सुरक्षित वाटत नाही त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही.' अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर प्रकरण पुन्हा चिघळलं होतं. त्यानंतर कंगनाने पुन्हा ट्वीटरवर मी 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय, ज्यांची हिंमत असेल त्यांनी अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारं ट्वीट केले आहे. Kangana Ranaut on Sanjay Raut: संजय राऊत मी तुमची निंदा करते, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात; कंगना रनौत हिचे सडेतोड उत्तर

Kangana Ranaut ट्वीट  

दरम्यान कंगनाने देखील ट्वीटरवर यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. ते मला काही दिवसांनी मुंबईला परतण्याचा सल्ला देऊ शकला असता पण त्यांनी 'भारत की बेटी' चा आत्मसन्मान राखला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं सांगत हिमाचल सरकार आणि केंद्र सरकारकडे मदत मागितली होती.