Kangana Ranaut on Sanjay Raut: संजय राऊत मी तुमची निंदा करते, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात; कंगना रनौत हिचे सडेतोड उत्तर
Kangana Ranaut And Sanjay Raut (Photo Credits: PTI)

आपल्या बेधडक वक्तव्यामुळे अनेकदा वादाच्या भोव-यात अडकलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने मुंबई (Mumbai) आणि मुंबई पोलिसांबाबत (Mumbai Police) केलेल्या विधानामुळे चांगलीत गोत्यात अडकली आहे. या बॉलिवूडसह अनेक राजकीय नेत्यांनी तिच्यावर टिका करायला सुरुवात केली आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगना हिला 'हरामखोर मुलगी' (Haramkhor) असा शब्द वापरल्यामुळे कंगना चांगलीच पेटून उठली आहे. आपला संताप व्यक्त करत तिने ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 'मी तुमची निंदा करते संजय राऊत, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात'

असं तिने या व्हिडिओत म्हटले आहे.

'मला हरामखोर म्हणणा-या तुमच्या सारख्या मानसिकता असणा-या लोकांची मी निंदा करते. संजय राऊत मी तुमची निंदा करते. तुम्ही महाराष्ट्र नाही आहात. त्यामुळे तुम्ही असं बोलू शकत नाही की मी महाराष्ट्राची निंदा करतेय.' अशा शब्दांत कंगनाने संजय राऊतांना उत्तर दिले आहे. Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी विचार करील - संजय राऊत

त्याचबरोबर 'मला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तुम्ही मला असे बोलू शकत नाही. मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या माणसांना माझे जे काय करायचे आहे ते करा. भेटूया 9 सप्टेंबरला' अशा शब्दात तिने संजय राऊतांना उघडपणे धमकी देखील दिली आहे.

दरम्यान आज सकाळी संजय राऊतांनी मिडियाला दिलेल्या मुलाखतीत 'कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली, तर मी विचार करील,' असं म्हटलं आहे. याशिवाय संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कंगनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. 'मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ' असं संजय राऊतांनी म्हटले आहे.