मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि मुंबई (Mumbai) शहर यांच्याविरोधात वक्यव्य केल्याने अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) अडचणीत सापडली आहे. मुंबई, ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर' (POK) सारखी भासते’ या आशयाच्या कंगनाच्या ट्वीटनंतर महाराष्ट्रामधील अनेक नेत्यांनी कंगनावर टीका केली. सध्या हाच वाद राज्यात सुरु असताना, कंगना रनौतचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. आपली बहिण रंगोलीसह कंगना मुंबईमध्ये दाखल झाली आहे. यावेळी होणारी गर्दी पाहता, विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या मुंबई विमानतळाला एका छावणीचे स्वरूप आले आहे. एकीकडे कंगनाला समर्थन देणारी करणी सेना व दुसरीकडे तिला विरोध करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन इथे चालू होते.
विमानतळावरील गर्दी पाहता कंगना दुसऱ्या गेटमधून बाहेर पडून आपल्या घरी पोहोचली आहे. सध्या याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेत्री कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वाद आज चांगलाच चिघळला. आज दुपारपर्यंत कंगना मुंबई येणार होती, परंतु त्यापूर्वीच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने आपल्या कारवाईला सुरुवात केली. पालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील पाली हिल येथे असलेल्या कार्यालयाला 24 तासांत दुसरी नोटीस पाठविली. यानंतर थोड्याच वेळात, बीएमसीची एक टीम बुलडोजर, क्रेन आणि हातोडा घेऊन या ठिकाणी पोहोचली आणि कार्यालयाचा काही भाग तोडण्यात आला.
त्यानंतर कंगनाने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर कोर्टाने बीएमसीला ही कारवाई ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. (Kangana Ranaut To Anil Deshmukh: माझी ड्रग्ज टेस्ट करा,चुक आढळली तर मुंंबई कायमची सोडेन- कंंगना रनौत)
पहा व्हिडीओ -
View this post on Instagram
#kanganaranauat arrives at her home, she did not exit from the gate we were waiting.
दरम्यान, मुंबईत येण्यापूर्वी कंगनाची कोरोना टेस्टही झाली होती, ती नकारात्मक आली. यानंतर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कंगना हिमाचल प्रदेशातील मंडीवरून चंदीगडकडे रवाना झाली. त्यानंतर दुपारी चंदिगढ वरून ती निघाली व आता तिचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. मुंबईबाबत केलेल्या वक्यव्यानंतर कंगनावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी शाब्दिक हल्ले केले. मात्र कंगनाही मागे हटली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने प्रतुत्तर देणे चालूच ठेवले.