Kangana Ranaut To Anil Deshmukh: माझी ड्रग्ज टेस्ट करा,चुक आढळली तर मुंंबई कायमची सोडेन- कंंगना रनौत
Kangana Ranaut To Anil Deshmukh (Photo Credits; File Image)

महाराष्ट्रात कंगना रनौत (Kangana Ranaut ) प्रकरणावरून गदारोळ माजल्याचं दिसत आहे. काही वेळापुर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कंगना रनौत हिची सुद्धा ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली जाईल असे म्हणत मुंबई पोलिसांना (Mumbai Police) चौकशीचे आदेश दिले होते. या संदर्भात कंगनाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे मुंबई पोलिस व गृहमंत्री अनिल देशमुख यांंनी माझी ड्रग्ज तपासणी करण्याचा निर्णय घेतला असेल तर उलट मला अधिक आनंद आहे. माझ्या चाचण्या करा, काही संंबंध आढळल्यास कॉल रेकॉर्डची चौकशी करा असे कंंगनाने सांंगितले आहे. इतकेच नव्हे तर मी चुकले तर माझी चूक मान्य करेन आणि मुंबई कायमची सोडेन असेही कंंगनाने सांंगितले आहे. 'माझी कर्मभूमी मुंबईवरील प्रेम सिद्ध करण्याची मला गरज नाही,- कंगना रनौत

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी लेखी तक्रार केल्याची दखल घेत या कारवाईचे आदेश दिले आहेत. यापुर्वी अध्ययन सुमन यांनी कंगना रनौत ड्रग्ज घेते आणि ती मला देखील घेण्यास जबरदस्ती करत होती असा खबळजनक आरोप केला होता. त्याचा दाखला देत अनिल देशमुखांनी विधानसभेत मुंंबई पोलिसांंना कंंगनाची सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

कंंगना रनौत Tweet

दरम्यान, कंगनाने आपण 9 सप्टेंंबर रोजी मुंंबईत येणार आहे असे सांंगितले होते. आजच्या ट्विट मध्ये सुद्धा तिने तुम्हाला लवकरच भेटेन असे म्हंंटले आहे. आपण मुंंबईत येताना शिवसेना किंंवा संजय राउत किंंवा ज्याचीही हिमंत असेल त्याने मला अडवुन दाखवावे असे कंंगनाने याआधी म्हंंटले होते. उद्या संध्याकाळपर्यंत कंंगना मुंंबईमध्ये आपल्या Y + सिक्युरीटी सोबत पोहचेल अशी माहिती आहे.