तिबेटमधील शिगात्से शहरात मंगळवारी (7 जानेवारी 2024) झालेल्या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 62 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. तिबेटमधील भूकंपामुळे झालेल्या विनाशानंतर बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. तिबेटमध्ये पहाटे तीन शक्तिशाली भूकंप झाले, या भूकंपाच्या धक्क्यांनी चीनसह नेपाळ, भारत, बांगलादेशसह इतर अनेक देश हादरले. यापूर्वी भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील लोबुचे क्षेत्र असल्याचे सांगितले होते परंतु नंतर ते बदलले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेट, चीनमध्ये होता, जिथे 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने जारी केलेल्या अहवालानुसार, भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला. सकाळी 6.35 वाजता झालेल्या पहिल्या भूकंपानंतर दुसरा हादरा 7.02 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर 7.07 वाजता 4.9 तीव्रतेचा तिसरा भूकंप जाणवला. (हेही वाचा: Earthquake News: नेपाळमध्ये पहाटे 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; दिल्ली-एनसीआर, बिहारसह देशातील अनेक भागात जाणवले धक्के)
Tibet Earthquake:
7.1-magnitude earthquake in Tibet kills 53 with tremors felt in Nepal, India.
📹AFP pic.twitter.com/oKfhFg4Eg7
— The Hindu (@the_hindu) January 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)